क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

दुखापत झालेली असतानाही मीराबाई चानूची अभिमानास्पद कामगिरी!

नवी दिल्ली | World Weightlifting Championship 2022 – भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक (Silver Medal) जिंकलं आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे मीराबाई चानू मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत होती. तरीही तिनं 200 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं आहे.

वेटलिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेत चीनच्या जियांग हुइहुआनं अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने 206 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकलं. तर टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन होऊ झिहुईने 198 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. दरम्यान मीराबाई चानूनं ऑलिम्पिक चॅम्पियन होऊ झिहुईला मागे टाकून 200 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावलं.

सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणादरम्यान मीराबाई चानूच्या मनगटात दुखापत झाली होती. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्येही ती दुखापतीसह सहभागी झाली होती. तसंच मीराबाईचं जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील हे दुसरं पदक आहे. यापूर्वी 2017 मध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये