ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

गुजरात राखलं, हिमाचल गमावलं! गुजरातच्या सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती, तर हिलाचलमध्ये काँग्रेसची मुसंडी!

गांधीनगर/शिमला : (Gujrat and Himachal Pradesh Assemble Election 2022) गुजरात विधानसभेच्या दोन टप्प्यात निवडणुका पार पडलेल्या. त्यानंतर गुरुवार दि. 08 नोव्हेंबरच्या सकाळपासून निकाल हाती येत आहेत. त्यामध्ये मागील 2017 च्या विधानसभेत 99 जांगावर असलेल्या भाजपने 150 जागांवर आघाडी घेत, सत्ता राखल्याचे दिसून येत आहे. तर सत्तेची स्पप्न पाहणाऱ्या ‘आप’ला केवळ ५ जागांवर आघाडी घेता आली आहे. 77 जागा असलेल्या काँग्रेसलाही खूप मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐतिहासिक विजय मिळवण्याची वल्गना केली होती ती कुठे तरी खरी ठरताना दिसत आहे. त्यामुळे गुजरात राज्याच्या सत्तेच्या चाव्या भाजपच्याच हाती कायम आल्या आहेत. सत्तेची स्वप्न बघणाऱ्या आपचे स्वप्न भंगल्याचे एकंदरीत दिसून येत आहेत. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची देखील नेतृत्त्वामुळे वाताहात झाल्याचे दिसून आलं.

भाजपने गुजरात राखलं आसलं तरी, हिमाचल प्रदेश हातून निसटत चाललं आहे. मागील निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या भाजपला या निवडणुकीत पराभवाला सामोरं जाव लागणार आहे. त्यामुळे भाजपने गुजरात राखलं, तर हिमाचल गमावलं असल्याचं बोललं जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदरात एक-एक राज्याच्या सत्तेच्या चाव्या हाती येणार आहेत. मात्र, गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेल्या आपला काहीच करिष्मा दाखवता आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये