क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

ईशानला पहिलीच संधी मिळाली अन् केली द्विशतकी खेळी, नवा विक्रमही नोंदवला!

चटोग्राम : (IND Vs BAG 3rd ODI Match) भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन दिवशीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताचा युवा सलामीवीर ईशान किशननं मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 200 धावा करणारा तो फलंदाज ठरलाय. त्यामुळे ईशानला पहिली संधी मिळताच त्या संधीचे सोनं करुन भारताला चांगला फलंदाज मिळाला आहे.  

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या हाताला दुकापत झाल्यामुळे ईशान किशनला संधी मिळाली त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांने लक्ष वेधून घेतलं. तर दिपक चहरच्या ऐवजी कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. या मिळालेल्या संधीचं ईशान किशनं सोनं करून दाखवलं आहे. 

इशान किशनने 50 चेंडूत अर्धशतक, 85 चेंडूत शतक, 103 चेंडूत 150 धावा केल्यानंतर या सलामीवीराने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. इशान 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्यांने 23 चौकार आणि 9 षटकार मारले. यापूर्वी माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये