ताज्या बातम्यामनोरंजन

‘वेड’ चित्रपटानंतर आता जिनिलिया ‘या’ मराठी मालिकेत करणार एन्ट्री, पाहा व्हिडीओ

मुंबई | Genelia Deshmukh – सध्या बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसंच रितेश आणि जिनिलियाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्तानं जिनिलिया आता लवकरच मराठी मालिकेत एन्ट्री करणार आहे.

रितेश आणि जिनिलिया वेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलिया स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegala) या मालिकेत एन्ट्री करणार आहे. छोट्या पडद्यावरील रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अगदी कमी कालावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच जिनिलिया आता या मालिकेत दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, वेड या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखनंच केलं आहे. या चित्रपटाद्वारे जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तसंच या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) आणि अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) इत्यादी कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये