ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शाईफेकीचं समर्थन नाही, पण तालिबान्यासारखं वागू नका? राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांवर ओढला आसूड

पुणे : (Raju Shetty On Chandrakant Patil) शनिवार दि. 10 नोव्हेंबर रोजी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक झाली. त्यावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, शाईफेकीचे समर्थन करणं चुकीचं आहे पण ज्याने शाईफेक केली आहे, त्याच्यावर लावण्यात आलेले गुन्हे पाहता सरकार तालिबान्यासारखं वागू लागलं आहे, असा टीकेचा आसूड यांनी राज्य सरकारवर ओढला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ३०७ सारखा गंभीर गुन्हा शाईफेक करणाऱ्यावर लावला आहे. धारदार शस्त्राने वार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर हा गुन्हा दाखल केला जातो. मग असं असताना एवढा गंभीर गुन्हा संबंधितावर दाखल करण्याचं कारण काय? असा सवाल करत हेच कमल दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात ज्यांनी बळीराजाचा बळी घेतला त्यांच्यावर का दाखल केले नाहीत, असा रोखठोक सवाल राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्याचं मनोज गरबडे असं नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असून समता सैनिक दलाचा पदाधिकारी म्हणूनही काम करतो. त्याला काहीच वेळात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले. परंतु त्याच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारचं तालिबानी वागणं असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetty

https://www.facebook.com/photo?fbid=683617019793046&set=a.252946999526719

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये