ताज्या बातम्यारणधुमाळी

“…हे कितपत शहाणपणाचं आहे”, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

मुंबई | Sharad Pawar – रविवारी (11 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी समृद्धी महामार्गासह विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. दरम्यान, मोदींनी केलेल्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणं कितपत शहाणपणाचं आहे? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. ते आज (11 डिसेंबर) त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, “काल नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये मोदींनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीनं किंवा निवडणुकीच्या निमित्तानं जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा 100 टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचं उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

“आत्तापर्यंत मी अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले आहेत. त्यांची भाषणं ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टीका केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये