ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बाॅस मराठी’च्या घरात तेजस्विनी लोणारी पुन्हा करणार एन्ट्री? पोस्ट शेअर करत म्हणाली,”लवकरच तुम्हाला…”

मुंबई | Bigg Boss Marathi 4 – ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या पर्वातील प्रत्येक सदस्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच या सीझनमध्ये आत्तापर्यंत चार वाईल्ड कार्ड एन्ट्रीही (Wild Card Entry) झाल्या. तर दुसरीकडे घरातील सगळ्यांची आवडती स्पर्धक तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) दुखापतीमुळे हा खेळ अर्ध्यावर सोडावा लागला. त्यानंतर तेजस्विनीचे चाहते निराश झाले होते. दरम्यान, आता तेजस्विनीनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन तेजस्विनी पुन्हा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं म्हटलं आहे की, “माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचं मला समजलं.”

“मुळात, तसं काहीही झालं नाही. माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झालं असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असं माझ्या डॉक्टरांनी सांगितलं. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या”, असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच तिनं शेअर केलेल्या या पोस्टनंतर ती पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये