क्राईमटेक गॅझेटताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन पेमेंट करताय तर सावधान! तुम्ही वापरत असलेल्या ॲपवर अशी होतेय फसवणूक, जाणून घ्या

मुंबई | Online Payment Fraud – सध्याच्या काळात प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटचा (Online Payment) पर्याय मोठ्या प्रमाणात निवडताना दिसतात. तसंच ॲपवर ऑनलाइन व्यवहार करणे आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. त्यामुळं लोकं आता गुगल पे (Goggle Pay), पेटीएम (Paytm), फोनपे (Phone Pay) सारख्या अॅप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. मात्र, आता या ॲपद्वारे देखील आपली फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट ॲप वापरत असाल तर खबरदारी घ्या.

देशात ऑनलाइन फसवणूकीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. सतत नवनवीन मार्गांनी फसवणूक करणारी टोळी लोकांना लुटत असते. अशातच आता ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चुकून पैसे पाठवले आहेत, असं सांगत लोकांची फसवणूक केली जात आहे. अशीच एक घटना मुंबई परिसरात घडली. यामध्ये एका व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पैसे दुसऱ्याला पाठवत होतो परंतु तुम्हाला चुकून पाच हजार रुपये आले आहेत. मला माझे पैसे परत करा, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली आहे असं सांगितलं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीनं त्यानं पाठवलेली रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्याच्या अकाउंट मधून पाच हजार रुपये वजा झाले. त्याची ही झालेली फसवणूक काही वेळानं त्याच्या लक्षात आली. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक होत असल्याचं सध्या उघडकीस येत आहे.

तुम्हाला एखादा अनोळखी व्यक्ती मेसेज पाठवेल आणि भासवेल की मी तुम्हाला काही पैसे पाठवले आहेत. तुम्हाला हे पैसे चुकून आले असं ते सांगतात. तसंच हे अज्ञात व्यक्ती सांगतात की, हे पैसे वैद्यकीय कारणासाठी मी कोणालातरी पाठवत होतो. तर कोणी सांगत की, मी एक विद्यार्थी आहे. ते पैसे मी फीजसाठी भरत होतो, मात्र तुम्हाला चुकून आले. मग आपल्याला वाटतं की खरंच हे पैसे चुकून आले असतील. पैसे परत पाठवण्यासाठी ते आपल्याला एक अप्रू लिंक पाठवतात. त्या प्री-लिंकवर क्लिक केल्यावर आपण आपला पिन क्रमांक टाकायचा असतो. मग आपण क्लिक करत प्रोसेस कम्प्लीट करतो आणि आपल्या अकाउंट वरून त्याला पैसे जातात. अशाप्रकारे हे फ्रॉड घडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये