महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर जयंत पाटलांनी एलन मस्ककडे केलेल्या मागणीची होतेय चर्चा!

मुंबई | Jayant Patil On Elon Musk – सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra Karnataka border dispute ) दोन्हीकडील वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटरवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. मात्र, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केलं नाही, असं म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केलं आहे? याचा निकाल द्यावा असं म्हटलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा होतेय.
एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का? असा सवाल विचारला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी थेट एलन मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं ट्विट त्यांनी केलेलं नाही, असं कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केलं आहे?”, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, एलन मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं आहे की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ मस्क यांच्या या ट्विटनंतर जंयत पाटील यांनी त्यांना टॅग करत ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्याआधी कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकाल द्या,असं म्हटलं आहे.