ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“संजय राऊतांच्या वात्रट तोंडाला कंटाळून आमदारांनी…”, संजय गायकवाड यांचं टीकास्त्र

मुंबई | Sanjay Gaikwad On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली आहे. ज्या पद्धतीनं 50 खोके देऊन महाराष्ट्रातले 40 आमदार फोडण्यात आले, तो नक्की काय व्यवहार होता, त्यावरही एक एसआयटी स्थापन व्हायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राऊतांच्या या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“आमदार खोके घेऊन फुटले नाहीत तर ते संजय राऊतांचं वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता, घरातून चालणारं सरकार, मातोश्री आणि वर्षाचे बंद दरवाजे याला कंटाळून त्यांनी उठाव केला आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “सत्तेवर 11 कॅबिनेट मंत्री लाथ घालून जातात मग याला फुटला, गद्दार कसं काय म्हणायचं. लोकं मंत्रीपदासाठी हजारो, कोटी देण्यास तयार असतात. ते सोडून 50 खोक्यांसाठी जाणार म्हणता, आता संजय राऊतांना तेवढी तरी अक्कल पाहिजे”, अशी टीकाही गायकवाड यांनी केली.

“जनतेसमोर आम्ही आमदार म्हणून कोणतं तोंड घेऊन जाणार होतो. तुम्ही मंदिरं बंद करुन टाकली, यात्रा, निवडणुका, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सगळं बंद करुन टाकलं होतं. हे सर्व काय चाललं होतं. हा पाकिस्तान आहे की हिंदुस्थान. त्यामुळे सर्व आमदारांनी उठाव केला. हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा करु शकत नाही यामुळेच हा उठाव करण्यात आला”, असंही संजय गायकवाड म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये