ताज्या बातम्यामनोरंजन

गौतमी पाटील झळकणार रूपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटात करणार काम

मुंबई | Gautami Patil – आपल्या नृत्यानं आणि दिलखेच अदाकारीनं महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही गुडन्यूज गौतमीनं स्वत: चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे.

गौतमीचा एका कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन गौतमी विरोधात संताप व्यक्त केला जात होता. यामध्ये अनेक लावणी कलाकारांनी देखील संताप व्यक्त केला होता. दरम्यान, आता गौतमी पाटील लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. ‘घुंगरु’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

गौतमीनं तिच्या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ती म्हणाली की, “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. आम्ही या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहा”, असं आवाहन तिनं केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये