ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘मला वेड लागले प्रेमाचे’ म्हणणारी केतकी माटेगांवकर अखेर पडली प्रेमात?

मुंबई : (Ketki Mategaonkar News Panjabi Song ‘Pakka Pakka Pyar’) अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह अनेक चित्रपत्राट उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केतकीने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं एक वेगळं स्थान निर्मान करुन ठेवलं आहे. या सर्व चित्रपटांतील भूमिकांमुळे एक सोज्जवळ, सुसंस्कृत, अशीच ओळख तिच्या फॅन्सच्या मनात आहे.

अशातच आता केतकी माटेगांवकर प्रेमात पडली आहे. मला वेड लागले प्रेमाचे म्हणणारी सर्वांची लाडकी प्राजु म्हणजेच गायिका अभिनेत्री केतकी माटेगांवकर चक्क प्रेमात पडली आहे.. पण हे प्रेम खऱ्या आयुष्यात नाही तर तिच्या नवीन गाण्यात.

केतकीच ‘पक्का पक्का प्यार’ हे पाहिलं वहिलं पंजाबी गाणं नुकतंच लोकांच्या भेटीला आलं आणि ह्या गाण्यानी इंटरनेट वर धुमाकूळ घातला . हे एक रोमँटिक गाणं असून केतकी एकदम कलरफुल वेशभूषेत दिसत आहे. नुकतंच केतकी ने हे गाणं आपल्या youtube वर share केला आहे आणि ह्याला तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय.

ह्याचसोबत सर्वत्र चर्चा ह्या गाण्यामध्ये मध्ये दिसणाऱ्या mystry boy ची होत आहे. कोण आहे हा तिचा पक्का पक्का प्यार वाला ‘वीर’ असा प्रश्न सगळ्या नेटकऱ्यांना पडला आहे. तरी ह्याच उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे. तरीसुद्धा केतकीचे चाहते पूर्ण social media वर ह्याचा उत्सुकतेने शोध घेत आहेत. त्यामुळे केतकीच पक्का पक्का प्यार आणि हा mystry boy सर्वत्र viral होताना आपल्याला दिसतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये