रितेश-जिनिलियाचा ‘जाणून घ्या’ सिनेसृष्टीतील 20 वर्षाचा प्रवास…

मुंबई : (Ritesh Deshmukh And Genelia Dehsmukh) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दोघेही आज बाॅलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आज त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
रितेश-जिनिलियाने वीस वर्षांपूर्वी 2003 साली ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कलाकार म्हणून सिनेसृष्ठीत पदार्पण केलं. सध्या दिग्दर्शक, निर्माते अशा विविध भूमिका ते बजावत आहेत. एकीकडे रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला वीस वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीला देखील (4 जानेवारी) रोजी 10 वर्ष पूर्ण होत आहेत.
पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘कूल है हम’, ‘ब्लफमास्टर’, ‘बे बेबी’, ‘धमाल’, ‘दे ताली’, ‘हाऊसफुल्ल’, ‘डबल धमाल’, ‘हाऊसफुल्ल 2’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘ग्रॅंड मस्ती’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्याने काम केलं आहे. रितेशने 2013 साली ‘बालक-पालक’ या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 2014 साली ‘लय भारी’ या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनेक लोकप्रिय सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून देखील तो झळकला आहे.