ताज्या बातम्यामनोरंजन

“अर्चना व सौंदर्या एकाच बेडवर…”, शालीन भानोतचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | Bigg Boss 16 – सध्या ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हा शो चांगलाच चर्चेत आहे. यातील प्रत्येक स्पर्धकानं आपल्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये टीना दत्ता (Teena Datta) आणि शालीन भानोत (Shalin Bhanot) यांची जोडी बिग बाॅसच्या घरात कायम चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी टीना घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर शालीन-टीनामध्ये वादाची ठिणगी पडली. पण आता पुन्हा एकदा शालीन व टीना एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉस 16च्या घरामध्ये नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन घरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी शालीन व टीना एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचं दिसले. त्यामुळे घरातील इतर सदस्य या दोघांबाबत चर्चा करू लागले. दरम्यान, घरातील प्रत्येकजण आपल्या नात्याबाबत बोलत आहे हे पाहून शालीन सगळ्यांची समजूत काढताना दिसला. जेव्हा तो अर्चना गौतमशी (Archana Gautam) बोलायला गेला तेव्हा या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. शालीन अर्चनाला म्हणाला की, “टीना आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. तसं पाहायला गेलं तर तू आणि सौंदर्याही एकाच बेडवर चादर घेऊन झोपता. मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”

शालीनचं हे बोलणं ऐकून अर्चनाला राग अनावर होतो. तसंच सौंदर्याही शालीनच्या बोलण्याला विरोध दर्शवते. शालीन जे बोलला आहे ते अर्चना निमृतला सांगते. यावेळी अर्चना म्हणते की, “शालीनची मुलं जेव्हा शाळेत जात असतील तेव्हा त्याच्या मुलांनाही लोकं ऐकवत असतील. तुमचे वडील ‘बिग बॉस’मध्ये काय करतात? असं लोक बोलत असतील.” यानंतर अर्चना व शालीन यांच्यातील वाद आणखीनच वाढताना दिसतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये