ताज्या बातम्यादेश - विदेशशेत -शिवार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा हप्ता होणार जमा, पण त्याआधी करा ‘हे’ काम, अन्यथा…

नवी दिल्ली : (PM Kisan Yojana 13th Installment) देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, पंतप्रधान किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये डीबीटीद्वारे वर्ग केले जात आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये ट्रान्सफर मिळाले असून शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. मात्र, पैसे खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता करवी लागणार आहे. तुम्ही अद्याप जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ते काम लवकर पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्ही पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळेच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन हे काम पूर्ण करून घ्या.

या योजनेत ज्या लोकांनी आतापर्यंत फसव्या पद्धतीने लाभ घेतला आहे. या लोकांची नावे त्या-त्या राज्यांनी जाहीर केली आहेत. आता त्या लोकांकडून पैसे परत घेतले जात आहेत. यावेळी त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तसेच मागील हप्त्याचे पैसे त्यांना सरकारला परत करावे लागणार आहेत. फसवेगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये