विरूष्काच्या लेकीची छबी कॅमेऱ्यानं पुन्हा टिपली, पहा व्हिडीओ

मुंबई | Vamika – बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांची लेक सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनुष्का आणि विराटनं अद्याप लेक वामिकाचा (Vamika) चेहरा माध्यमांना दाखवला नाहीये. तसंच तिचे फोटो किंवा व्हिडीओ न काढण्याची विनंती त्यांनी पापाराझी, फोटोग्राफर्सना केली आहे. मात्र, तरीही विराटच्या एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या विंगेत वामिकाला घेऊन उभ्या असलेल्या अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर विराट-अनुष्कानं पोस्ट लिहित युजर्सना ते डिलिट करण्याची विनंती केली होती. तसंच आता देखील विरूष्काच्या लेकीची छबी कॅमेऱ्यानं टिपली आहे.
विराट आणि अनुष्का मुलगी वामिकासोबत नुकतेच वृंदावनला गेले होते. यावेळी त्यांनी हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली. विराटनं महाराजांसोबत अध्यात्मिक चर्चा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. या आश्रमामध्ये पार पडलेल्या या सत्संगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडीओतील चिमुकल्या वामिकानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओत वामिका आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तसंच ती मस्ती देखील करताना दिसत आहे. मात्र, यामध्ये तिचा चेहरा पहायला मिळत नाहीये. अनुष्काला स्वामीजी ओढणी देतात आणि वामिकाच्या गळ्यात माळ घालतात. वामिकाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील केल्या आहेत.