ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीशेत -शिवार

जगात जर्मनी, अन् ‘भारतात परभणी’ पुन्हा सिद्ध! हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन

परभणी : (Parbhani Hindu Muslim Unity) संपुर्ण देशात धार्मिक वाद विकोप्याला गेलेला असताना परभणीत मात्र, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आलं. सर्वधर्म समभाव हा राज्यातील एकोप्याचा मोठा पाया आहे. परंतु मागच्या काही दिवसात राज्यभरात विविध धर्मात तेढ वाढण्याचे प्रकरण समोर येत असताना परभणीत मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन वारंवार पाहायला मिळत आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे. एवढच नाही तर या मुस्लिम बांधवाने शिवपुराणासाठी चक्क 15 एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवलाय..

“जगात जर्मनी अन भारतात परभणी”अशी म्हण परभणीबाबत प्रचलित आहे. हे म्हणण्या सारखे नेमकं परभणीत असं काय आहे असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचे उत्तर आहे ते म्हणजे परभणीची माणसं.. कुणालाही आपलेसे करण्याची इथली परंपरा आहे..त्यातच सर्वधर्म समभावाने इथे सर्वच समाज बांधव वागतात..आता हेच बघा ना परभणीत आठ डिसेंबरला मुस्लिम समाजाचा इजतेमा पार पडला..तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव इथे आले, धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी इथे हिंदू बांधव मदतीला आहे..इजतेमा साठी हिंदूंची जमीन देण्यात आली, तसेच इतर सोयीसुविधांची हिंदु समाजातील तरुणांनी व्यवस्था केली होती.

येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे विख्यात शिवपुराण शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केले आहे. आता एवढा मोठा कार्यक्रम नेमका घ्यायचा कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपली ६० एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यातील 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकर वर लावलेल्या हरभऱ्यावर त्यांनी नांगर फिरवत हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी लाखोंचे नुकसान सहन केले आहे. जिथे शिवपुराण कथेची जोरदार तयारी सुरूय..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये