क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

IND Vs SL: भारतीय संघाला धक्का! वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर

मुंबई : (Jasprit Bumrah to miss Sri Lanka ODIs) भारत-श्रीलंका वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीनंतर तब्बल पाच महिन्यानी पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. एवघ्या सहा दिवसांपुर्वीच जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला होता. या निर्णयानंतर आज त्याला बाहेर पडावं लागलं.

दरम्यान, गुवाहाटीमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळायचा आहे. अवघ्या सहा दिवसांच्या क्रिकेट बोर्डाच्या हो नाहीच्या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

पाठिच्या दुखण्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेला बुमराह वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. एनसीएने फिट घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला. पण आता अचानक बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये