ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“पवारांचं उभं आयुष्य गेलं, पण…”पडळकरांचं शरद पवारांवर टिकास्त्र

मुंबई : (Gopichand Padalkar On Sharad Pawar) शरद पवारांनी सरकारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये अनेक उद्योग शरद पवार यांनी आणले. शिक्षण क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, त्यांनी मोठं काम केलं आहे. पवारांमुळे आज महिलांना आरक्षण मिळालं आहे. म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जहरी टीका आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप गोपीचंद पडळकर म्हणाले की, “शरद पवार जाणते नाहीतर नेणता राजा आहेत. यावरती सर्व लोकांचा आक्षेप आहे. पण, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील लोकांना चाटूगिरी करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते ठासून बोलतात. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात जोरात काम सुरु आहे. त्यामुळे शरद पवारांची फडणवीसांबरोबर तुलना होऊ शकत नाही. पवारांचा तीन-साडेतीन जिल्ह्यांतील पक्ष आहे. पवारांचं उभं आयुष्य गेलं, पण तीन अंकी आकडा पार करत आला नाही.”

“फडणवीसांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार आले. तुम्ही त्यांची कुठं माप काढत बसता आहात. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व दूरगामी आणि गावगाड्यापर्यंत पोहचलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीसांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांचा हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये