क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

रोहित पवारांची निवड धक्कादायक! परंपरेला धोका आणि नुकसान करणारी; राम शिंदेंचा आरोप

अहमदनगर : (Ram Shinde On Rohit Pawar) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात असताना मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी मात्र ही निवड धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटच्या परंपरेला धोका पोहचविणारी आणि नुकसान करणारी ही निवड असल्याचे ते शिंदे म्हणाले.

आमदार शिंदे आणि आमदार पवार यांच्यात अलीकडे टोकाची राजकीय स्पर्धा वाढली आहे. एकमेकांच्या कामाचे श्रेय घेण्यावरून, कार्यकर्ते फोडण्यावरून त्यांच्यात आरोपप्रात्यारोप होत असतात. अलीकडे एका व्यासपीठावर येणेही ते टाळतात. एवढेच नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही टाळले जाऊ लागल्याचे दिसून येते.

आमदार पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावर प्रसार माध्यमांनी प्रा. शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, महाराष्ट्राच्या क्रिकेटला मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत खेळाडू या क्षेत्रात होऊ गेले. सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, सचिन तेंडूलकर अशा दिग्गजांची परंपरा आहे. मात्र, क्रिकेटशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीची केवळ कोणा बड्या नेत्याचा नातेवाईक म्हणून थेट निवड होणे हे धक्कादायक आणि क्रिकेटसाठी नुकसानकारक आहे, असेही शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये