“त्यांनी बंडखोरी करून…”, सत्यजीत तांबेंबाबत अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

नांदेड | Ashok Chavan On Satyajeet Tambe – प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या पदवधीर मतदारसंघासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, सुधीर तांबेंनी माघार घेत आपला मुलगा सत्यजीत तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. याबाबत आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. सत्यजीत तांबेंनी पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचं अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, नामांकन फाॅर्म काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कोरा दिला होता. मुलाची जर इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलानं उमेदवारी दाखल करणं ही गंभीर बाब आहे.
सुधीर तांबे हे मूळ उमेदवार असताना त्यांनी नामांकन पत्र भरलं नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळं हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. जर तुमच्या मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण मुलानं उमेदवारी अर्ज दाखल न करता उमेदवारी दाखल करणं गंभीर आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना या प्रकरणातील अधिक माहिती असू शकते. याबाबत पक्षश्रेष्ठींनी दखल घेणं गरजेचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
वास्तुस्थिती समजून हे घडण्यामागचं नेमकं कारणं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. पक्षानं अशा घटनांवर गंभीर दखल घ्यावी. पक्षाला या घटनेमुळं एक जागा गमवावी लागत आहे. काल जे काही घडलं त्यामध्ये पक्षाचं नुकसान झालं आहे. यावर कोणी बोलू किंवा न बोलू जे घडलंय ते समोर आहे. त्यामुळं यातील सत्यता तपासावी लागेल, असंही चव्हाण म्हणाले.
One Comment