ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मी बाळासाहेब थोरात यांना आधीच सांगितलं होतं की…”, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई | Ajit Pawar – प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या पदवधीर मतदारसंघासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, सुधीर तांबेंनी माघार घेत आपला मुलगा सत्यजित तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेस तसंच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याबाबत आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असं मी बाळासाहेब थोरात यांना आधीच सांगितलं होतं, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“दोन दिवसांपासून काहीतरी वेगळंच कानावर येत होतं. म्हणून मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजतंय, माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, असं मी त्यांना सांगितलं होतं. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असं त्यांनी मला सांगितलं होतं”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, सुधीर तांबेंनी माघार घेत आपला मुलगा सत्यजित तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. जर सत्यजित तांबेंचा या जागेवर विजय झाला तर ते अपक्षच आमदार असतील. त्यामुळे काँग्रेसनं निवडणुकीआधीच ही जागा गमावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये