बाबो! पत्नी न सांगता गेली माहेरी अन् संतापलेल्या पतीनं केलं असं काही की, तुम्ही विचारही करू शकणार नाहीत
पटना | पती-पत्नीमध्ये वाद होणं हे काही नवीन नाहीये. प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणं (Husband-Wife Fight) ही होतातच. मात्र, कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की त्यातून काहीतरी भयंकर अशी घटना घडते. अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी न सांगता माहेरी निघून गेली म्हणून तिच्या संतापलेल्या पतीनं स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रजनी नया आणि कृष्णा बासुकी हे दोघं बिहारमधील मधेपुरा येथील रजनी गावात वास्तव्यास आहेत. एकेदिवशी संध्याकाळी कृष्णाची पत्नी रजनी अचानक न सांगता माहेरी निघून गेली. पत्नी न सांगता अचानक माहेरी गेल्यानं त्याला राग अनावर झाला. आणि त्यानं स्वतःचं गुप्तांग कापलं आहे. तसंच हा पठ्ठ्या एवढ्यावरच थांबला नाही तर, त्यानं कापलेला प्रायव्हेट पार्ट कुलदेवीच्या ठिकाणी अर्पण केला आहे.
ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णाला जवळील रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी योग्य ते उपचार करत त्याचा प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला. मात्र, कृष्णाची शाररिक स्थिती पहिल्याप्रमाणे राहिल की नाही हे आता सांगणं कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.