“म्हारी छोरीया छोरों से…”; पहिल्याच १९ वर्षांखालील मुलींच्या वर्ल्डकपवर भारतीय मुलींनी कोरले नाव
u19t20worldcup : भारतीय संघाने पहिला १९ वर्षांखालील मुलींचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या (shefila warma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने (TeamIndia) गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत कमाल करून दाखवली. भारतीय संघाने आजच्या शेवटच्या सामन्यात ७ गडी राखून इंग्लंडच्या संघाला धूळ चारली. त्यामुळे भारतीय मुली क्रिकेट क्षेत्रातही पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. u19t20worldcup
शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत.
आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाआणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.