जिथे दिसेल तिथे त्याला ठोका; अमोल मिटकारींनी घेतली बागेश्वर बाबांची हजेरी
![जिथे दिसेल तिथे त्याला ठोका; अमोल मिटकारींनी घेतली बागेश्वर बाबांची हजेरी rashtrasanchar news 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/01/rashtrasanchar-news--1.jpg)
अकोला | बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांना त्यांची पत्नी रोज काठीने मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबांनी केले आहे. त्यामुळे त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
बागेश्वर बाबांना दिसेल तिथे ठोका. या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायाने आता यापुढे जिथे दिसेल तिथे त्याला ठोका… असं आवाहनच अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायाला केलं आहे.
तुका म्हणे गाढव लेका…
तुझ्या सारख्यांची कोल्हे कुई करतच असतात. तेव्हा अशांच्या नाजूक भागांवर फटके दिल्यावरच यांचे तोंड बंद होतं. तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुका म्हणे गाढव लेका, जिथे दिसेल तिथे ठोका. म्हणून त्यांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे, असे बोलत अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला आहे.