“हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे”; हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर ‘अदानी’ समूहाकडून स्पष्टीकरण!
!["हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे"; हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर 'अदानी' समूहाकडून स्पष्टीकरण! rashtrasanchar news 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/01/rashtrasanchar-news-1-1.jpg)
Gutam Adani | जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदानी (Gutam Adani) यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चनं (Hindenburg Research) प्रसिद्ध केलेल्या 32 हजार शब्दांच्या अहवालात अदानी समूहावर मोठे आरोप केले आहेत. अदानी समूहानं शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉड केला आहे. ‘कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूक’ आहे असा दावाही हिंडेनबर्गनं केला आहे. अदानी समूहानं हे सर्व आरोप फेटाळले असून कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला (Adani Group) 4.2 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच अदानी समूहाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर देत 413 पानांचं स्पष्टीकरण जाहीर केलं आहे. त्यात लिहलं की, “‘हिंडेनबर्ग’चा अहवाल हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. अदानी समूहावरील लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हा अहवाल म्हणजे अमेरिकास्थित कंपन्यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी तयार केला आहे.” असे स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले आहे.
हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे…
“हा अहवाल भारतातील संस्थानांच्या स्वतंत्रता, अखंडता, गुणवत्ता आणि विकासावर केलेला हल्ला आहे. विश्वासार्हता आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल ‘स्वतंत्र’ संशोधन केलेला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,” असं अदानी समूहाने जारी केलेल्या 413 पानांचं स्पष्टीकरणात म्हटलं आहे.