पुण्यातील धक्कादायक घटना; अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न

पुणे | सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी अक्षय राजू चव्हाण (वय २४) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडितेचा आरोपी अक्षय चव्हाण हा तिचा पाठलाग करत होता. फिरायला जाऊ असे सांगून त्याने पीडितेसोबत त्याने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने ॲसिड सदृश ज्वलनशील द्रवपदार्थ फेकून तिला मारण्याचा प्रयत्न केला, असे अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड याप्रकरणी तपास करत आहेत.