ताज्या बातम्यापुणे

“आरोपी पकडा आणि बक्षीस मिळवा;” पुणे पोलिसांची अनोखी शक्कल

पुणे | पुणे (Pune) आणि कोयता गँग (Koyta Gang) जणू समीकरणच झालंय की काय? असंच दिसत आहे. दररोज कोयता गँगच्या दहशतीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कोयता गँगच्या गुंडांनी तर शहरात धुमाकूळ घातला आहे.

कोयता गँगला आटोक्यात आणण्याचे जणू पोलिसांसमोर आव्हानच निर्माण झाले आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस (Pune Police) प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे. ‘गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा’अशी ही योजना आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये