ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी ‘अर्चना गौतम’ एकेकाळी अशी दिसायची…

मुंबई | बिग बाॅस 16 (Bigg Boss 16 ) च्या फिनालय विकसाठी अगदी काहीच दिवस शिल्लक असताना घरात रस्सीखेच सुरूच आहे. बिग बाॅसच्या घरातील वादग्रस्त खेळाडू म्हणून अर्चना गाैतम (Archana Gautam) हिचे नाव घेतले जाते. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्यासोबतच्या भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरेचा गळा पकडला होता. यानंतर अर्चना गाैतम हिला बिग बाॅसच्या घराबाहेरही काढण्यात आले होते. मात्र तीच अर्चना गौतम आता फिनालयपर्यंत येऊन पोहोचली आहे.

फिनालयपर्यंत गेलेल्या स्पर्धकांमध्ये अर्चना गौतम (Archana Gautam), प्रियांका चहर चौधरी(Priyanka Chahar Choudhary), शालीन भनोट (Shalin Bhanot) आणि निमृत कौर आहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) यांचा समावेश आहे. तर एमसी स्टॅन (MC Stan), शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि सुंबुल तौकिर खान (Sumbul Touqeer Khan) हे नॉमिनेट झाले आहेत. यादरम्यान अर्चना गौतमचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका शोसाठी ऑडिशन देताना दिसत आहे.

नऊ वर्षांपूर्वी अर्चना कशी दिसायची हे पाहून प्रेक्षकांना सुद्धा धक्काच बसला आहे. अर्चनाचा हा व्हिडीओ ‘बाजीगर’ या शोचा आहे. या शोच्या परीक्षकपदी भोजपुरी स्टार आणि राजकारणी रवी किशन, पंकज भदौरिया आणि इतर कलाकार आहेत. अर्चनाचा हा साधासरळ लूक पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

https://twitter.com/UrEyesOnMine/status/1620851152526131201?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1620851152526131201%7Ctwgr%5E34225ca32f8d58978b62d46c0dca17a6cf31bf2e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bollywoodlife.com%2Fbigg-boss%2Fbigg-boss-16-archana-gautam-looks-unrecognizable-in-throwback-clip-shared-by-fan-actor-and-politician-ravi-kishan-wishes-her-the-best-read-tweet-2327039%2F

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये