ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आरोग्यमंत्र्याच्या ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर, शिवसेनेचा जहरी बाण; “पन्नास खोके घेऊन सावंत यांचे डोके…”

सोलापूर : (Laxman Hake On Tanaji Sawant)आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार आहे. माझ्या विभागाकडे राज्यातील चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार असल्याची टीका तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केली.

दरम्यान, सावंतांच्या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिक वर्गणी काढून सावंत यांच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार आहे. त्याची त्यांना जास्त गरज असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केल्यानंतर आता संतप्त शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यात सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. पन्नास खोके घेऊन सावंत यांचेच डोके ठिकाणावर नसून त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल अशा शब्दात शिवसैनिकांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्यावर टीका केली आहे.

सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करत आपला रोष व्यक्त केला आहे. युवासेना तालुका प्रमुख वैभव काकडे यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधताना पन्नास खोके घेऊन सावंत यांचे डोके ठिकाणावर नसल्याने ते अशी बेताल वक्तव्य करू लागले आहेत. त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये