क्राईमताज्या बातम्यापिंपरी चिंचवडरणधुमाळी

प्रचार संपताच रात्रीचा खेळ? चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैशांसह रंगेहाथ पकडलं, व्हिडिओ व्हायरल

पुणे : (Chinchwad-Kasba By poll election) कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराच्या तोफा शुक्रवारी दि.२४ रोजी सायंकाळी ५ वाजता थंडवल्या. मात्र, त्यानंतर भाजच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा खेळ सुरु केला आहे. चिंचवड परिसरातील रहाटणी भागात रात्री दहाच्या सुमारास शिवराज कॉलणी येथील तांबे शाळेजवळ भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक विभाग भरारी पथक प्रमुख विकास वारभुवन यांनी फिर्यादी दिली आहे.

त्यानुसार माधव मल्लिकार्जुन मनोरे (वय ५१, रा. मथुरा कॉलनी, रहाटणी), स्वप्नील सुरेश फुगे, (वय ३५, रा. फुगेवाडी), कृष्णा बालाजी माने (वय २४, रा. फुगेवाडी) हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचे समोर येऊ लागले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे एवढी मोठी रक्कम मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला असून मतदारांपर्यंत हे पैसे पोहचण्याचा कार्यकर्त्यांचा उद्देश होता का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या व्हिडिओमध्ये मतदारांच्या चिठ्ठ्या, मतदारांची नावे, प्रभाग क्र. असे सर्व आढळून आले आहे.

दुसरीकडे पुण्यात कसबा निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करण्याच्या कारणावरुन महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीजवळ उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी कारवाईचं आश्वासनं दिल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागं घेतलं आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत पैशांचा होणारा वापर कधी थांबणार असा सवाल केला जात आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना पैसे सापडल्याचा प्रकार समोर येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये