प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केली सुसाईड नोट; सुशांत सिंह राजपूतचा केला उल्लेख, म्हणाली…

मुंबई | Payal Ghosh – प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) ही नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एक सुसाइड नोट (Suicide Note) शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसंच पायल घोषनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
पायल घोषनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सुसाईड नोट लिहीलेला एक फोटो शेअर केला आहे. “मी पायल घोष आहे. जर मी आत्महत्या केली किंवा हृदयविकाराच्या झटक्यानं माझा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार लोक असतील” असं पायलनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. तिच्या या सुसाईड नोटमुळे नेटकरीही गोंधळात पडले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत यासंदर्भात काळजी व्यक्त केली आहे.
पुढे पायलने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ओशिवरा पोलीस स्टेशन.. पोलीस माझ्या घरी आले होते..जर मला काही झालं तर कोणीच वाचणार नाही.. माझ्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारा मी कोणत्या परिस्थितीत आहे? मी सुशांत नसून मी पायल घोष आहे, मेले तर सर्वांना अडकवून मरेन.”
दरम्यान, पायलनं शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच पायलनं लिहिलेल्या या सुसाईड नोटमागचं कारण काय? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.