क्राईमताज्या बातम्यामनोरंजन

पुण्यात 8 वर्षांपासून वास्तव्यास होता पाकिस्तानी तरुण; बनावट कागदपत्रे बनवून केला पुणे ते दुबई प्रवास

पुणे | शहरातून दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशा घटनांमुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पुण्यातील खडक पोलिस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खडक पोलिस स्टेशन परिसरातून एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुहम्मद अमान अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही तो वास्तव्य करत असल्याचं आढळून आल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे. मुहम्मदने खोटी कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट काढला आहे. त्याचा वापर करून त्याने पुणे ते दुबई असा प्रवास केला. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुहम्मद पुण्यात भवानी पेठेतील चुडामण तालमीजवळ वास्तव्य करत होता. 2015 पासून आजपर्यंत बेकायदेशीरपणे कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं आहे. त्याने बनावट कागदपत्रे बनवून पुणे ते दुबई असा प्रवासही केला असल्याची माहिती समोर आली आहे. तरूणाचे वडील पाकिस्तानी असून आई भारतीय असल्याच पोलिस तपासात उघड झालंय. हेरगिरी किंवा तत्सम कुठल्या कारवायांमध्ये हा तरूण आहे का याचा तपास पुणे पोलिस करत आहेत. अवैधरित्या राहत असल्या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुहम्मदला ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये