ताज्या बातम्यामनोरंजन

अब्दु रोझिकचे एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर आरोप; म्हणाला, “माझ्या कारचं पॅनल तोडून मला…”

मुंबई | Abdu Rozik – सध्या अब्दु रोझिक (Abdu Rozik) आणि एमसी स्टॅन (Mc Stan) यांच्यातील वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. अब्दु आणि स्टॅन यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. त्यामुळे आता ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) च्या घरात तयार झालेली मंडली तुटणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच स्टॅन माझे फोन उचलत नसून माझ्याविरोधात काहीही अफवा पसरवत असल्याचा आरोप अब्दुनं केला होता. अशातच आता अब्दुनं स्टॅनच्या मॅनेजरवर आरोप केले आहेत. याबाबत अब्दुच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

या निवेदनातून अब्दु रोझिकनं एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “अब्दु आणि स्टॅन 11 मार्चला बंगळूरमध्ये होते. त्यावेळी अब्दुनं स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या काॅन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, अब्दुसोबत काॅन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरनं सांगितलं. तरीही अब्दुनं तिकीट काढून स्टॅनच्या काॅन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केला. पण स्टॅननं त्याच्या मॅनेजरला सांगून अब्दुला काॅन्सर्टमधून बाहेर काढायला सांगितल. तसंच त्याच्या कारचं पॅनल तोडून त्याचं नुकसानही करण्यास सांगितलं”, असं त्या निवेदनात म्हटलं आहे.

पुढे निवेदनात म्हटलं आहे की, “स्टॅनच्या आईसोबत अब्दुनं फोटो न काढल्यामुळे तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. पण, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अब्दुनं स्टॅनच्या आईला कॉल केला होता. तो व्यवस्थित खेळत असल्याचं त्यानं स्टॅनच्या आईला सांगितलं होतं.”

“अब्दुनं स्टॅनची आई हिजाब परिधान करते याचा कायम आदर केला आहे. त्यानं कधीच फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. हे मुस्लीम भाऊ समजू शकणार नाही. अब्दुनं स्टॅनला अनफॉलो केल्याचं स्टॅननं मंडलीला सांगितलं होतं. पण अब्दुनं स्टॅनला फॉलोच केलं नव्हतं. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर त्याचे 4 मिलियन फॉलोवर्स होते. तेव्हाही अब्दु स्टॅनला फॉलो करत नव्हता. तसंच अब्दुच्या उंचीवरुन बॉडी शेमिंग करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो”, असंही निवेदनात म्हणण्यात आलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये