आतिफ अस्लमच्या घरात झालं चिमुकल्या परीचं आगमन, ठेवलं ‘हे’ गोड नाव
मुंबई | Atif Aslam – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमच्या (Atif Aslam) घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. आज (23 मार्च) आतिफची पत्नी सारानं (Sarah Aslam) गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी आतिफनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांनी आतिफ आणि सारावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आतिफनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या क्यूट लेकीचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसंच हा फोटो शेअर करत त्यानं त्याच्या लेकीचं नावही सांगितलं आहे. आतिफ व सारानं त्यांच्या लेकीचं नाव ‘हलिमा’ असं ठेवलं आहे. “अखेर प्रतीक्षा संपली! आमच्या आयुष्यात माझ्या हृदयाच्या नवीन राणीचं आगमन झालं आहे. बाळ व आई दोघेही सुखरुप आहेत. हलिमा आतिफ अस्लमकडून रमजानच्या शुभेच्छा”, असं कॅप्शन आतिफनं त्याच्या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, आतिफनं 2013मध्ये साराशी लाहौरमध्ये निकाह केला होता. तसंच त्या दोघांना अब्दुल व अर्यान ही दोन मुले आहेत. आता त्यांच्या घरात चिमुकल्या हलिमाचं आगमन झालं आहे. आतिफनं शेअर केलेल्या हलिमाच्या क्यूट फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.