किंग खाननं खरेदी केली ‘ही’ अलिशान कार, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई | Shah Rukh Khan – बाॅलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याच्या हा चित्रपट सुपरहिट ठरला असून त्यानं बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पठाणच्या या यशानंतर शाहरूखनं आता एक अलिशान कार खरेदी केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
शाहरूख खाननं नुकतीच रोल्स-राॅयस (Rolls-Royce) ही अलिशान कार खरेदी केली आहे. ही कार रोल्स राॅयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही या प्रकारातील आहे. या गाडीला भारतातील सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखलं जातं. शाहरूखनं खरेदी केलेल्या या गाडीची किंमत 8 कोटींहून अधिक आहे. तसंच या अलिशान गाडीची ऑन रोड किंमत 10 कोटी असल्याचं बोललं जातंय.
शाहरूखनं खेरदी केलेल्या या नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याची ही गाडी पांढऱ्या रंगाची आहे. विशेष म्हणजे या गाडीला शाहरूखनं त्याचा लकी नंबर घेतला आहे. ‘555’ असा त्याचा गाडीचा नंबर आहे.
दरम्यान, पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरूखनं ही गाडी खरेदी केल्याचं बोललं जातंय. तसंच त्याच्या नवीन गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी या व्हिडीओ चांगलीच पसंती दर्शवली आहे.