इतरक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

“…अन् अरिजित सिंह भर मैदानात धोनीच्या पाया पडला”, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Arijit Singh – भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. त्याचे संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. चाहते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. तसंच त्याला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर आता धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत बाॅलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंह (Arijit Singh) हा धोनीच्या पाया पडताना दिसत आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामातील धोनी आणि अरिजित सिंहचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. कालपासून (31 मार्च) आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. तसंच यंदाच्या हंगामाचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

आयपीएलच्या उद्घाटनासाठी रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी अरिजित सिंहनं त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर धोनी मंचावर गेला. त्यावेळी त्यानं उपस्थित असलेल्या रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटियाला हात मिळवला. तर तो अरिजित सिंहकडे गेला असता अरिजित पटकन खाली वाकला आणि धोनीच्या पाया पडला. मग धोनीनं अरिजितला घट्ट मिठी मारली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये