छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती? अप्पीच्या उत्तरानं वेधलं सर्वांचं लक्ष; म्हणाली, “अनेक इतिहासकारांनी…”
मुंबई | Appi Aamchi Collector – सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) ही मालिका प्रचंड गाजताना दिसत आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. तसंच सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मालिकेतील अप्पीला छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची किती होती? असा प्रश्न विचारण्यात येतो. यावर अप्पीनं सर्वाचं मन जिंकून घेणारं असं उत्तर दिलं आहे. सध्या हो प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मालिकेत कलेक्टर या पदासाठी अप्पीची मुलाखत सुरू असते. यावेळी मुलाखत घेणाऱ्यांनी अप्पीला प्रश्न विचारला की, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती सांगू शकाल?”. या प्रश्नाचं उत्तर देत अप्पी म्हणाली की, “मॅडम वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. अंदाजे त्यांची उंची 5 फुट 5 इंचं ते 5 फुट 8 इंचं एवढी असेल”.
अप्पीनं दिलेल्या या उत्तरावर मुलाखत घेणारे म्हणतात की, “मला ठाम उत्तर हवं आहे”. यावर अप्पी म्हणते, “मॅडम 4 हजार 604 फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला आहे. साडे तिनशे वर्षाची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं आहे. आता या माणसाची उंची आपण कसी मोजायची नाही का.” अप्पीच्या या उत्तरानं सध्या सर्वांचीच मनं जिंकली आहेत. तसंच अप्पीचं नेटकऱ्यांनी कौतुक देखील केलं आहे.