‘ठाकरे गटातील 13 अन् राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात’ शिंदे गटाच्या दाव्यात तथ्य?

मुंबई : (Uday Samant on Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना लावणं कठीण झालं आहे. रोज नवनवीन चर्चा पुढे येताना दिसत आहेत. कोणता राजकीय नेता कधी काय निर्णय घेईल याची कोणीच शाश्वती देवू शकणार नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली. त्यातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे.
दरम्यान सामंत म्हणाले, ठाकरे गटातील 13 अन् राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील खारघर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवलं जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व शासकीय कामे बाजूला सारुन अचानक आपल्या मुळ गावी जाऊन एकांतवास स्विकारला असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या सर्व चर्चेला उधाण आलं असताना उद्योगमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यात किती तथ्य आहे? हा देखील सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसंच शिंदेंना सोबत घेऊनही भाजपला काहीही फायदा होत नाहीच शिवाय आगामी निवडणूकांत फटका बसणार असल्याचे निरक्षण विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पक्षश्रेष्ठीला पाठवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जमतेम 20 जागा, विधानसभेत 65 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपला लाभ होणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर शिंदे गटाच्या नाराज आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे खुले केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गट अवस्थ आहे.