Breaking News : जिया खान आत्महत्या प्रकरणात सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

मुंबई | Sooraj Pancholi – आज (28 एप्रिल) बाॅलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणावर (Jiah Khan Suicide Case) विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सीबीआय कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी कोर्टानं जिया खानचा बाॅयफ्रेंड सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता केली आहे. जियाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर होता.
जिया खान आत्महत्या प्रकरणाची सुनावणी विशेष सीबीआय न्यायालयात पूर्ण झाली होती. तसंच 20 एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठानं दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. तर आज या प्रकरणी न्यायालयानं निकाल दिला आहे.
या प्रकरणाचा निकाल तब्बल 10 वर्षांनी लागला असून यामध्ये सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “पुराव्यांच्या कमतरतेमुळे सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालं आहे”, असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं.