10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ‘खुपते तिथे गुप्ते’!

Khupte Tithe Gupte season 2 : छोटया पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका आणि नवे शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आता लोकप्रिय चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’ देखील एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे हा लोकप्रिय टीव्ही शो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’मधून गायक-संगीतकार अवधूत गुप्ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या नव्या सीझन काय काय गमतीजमती ऐकायला मिळणार यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या खास खुर्चीवर सेलिब्रिटी, राजकारणी मंडळींसह अनेक मान्यवर बसणार आहेत. गुप्तेंचे प्रश्न या मंडळींना फक्त खुपणार नाहीत. तर टोचणार आहेत. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यामुळे चाहते आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.