महिला पैलवानांवर टीका करणाऱ्या पीटी उषा यांच्यावर अभिनेत्री स्वरा भास्करने केला संताप व्यक्त

नवी दिल्ली | भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पीटी उषा (PT Usha) यांनी टीका केली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिला पैलवानांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील उषा यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
स्वरा भास्कर हिनं देखील ट्वीटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, ‘आपल्या सर्वोत्तम अशा महिला पैलवानांना त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आंदोलनासाठी प्रवृत्त करण्यात आलं.रेसलिंग फेडरेशनचे प्रमुख बृजभूषण याच्याविरोधात त्यांनी आंदोलन पुकारले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. हे होऊन अनेक महिने उटले परंतु त्यावर सरकारनं कोणतीही कारवाई केली नाही.’ अभिनेत्री स्वरानं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘आपल्या सर्वोत्तम अशा महिला खेळाडूंना त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं. हे वाईट आहे. परंतु यात आरोपी असलेल्या भाजप खासदाराला सरकार सतत वाचवत आहे.’
पीटी उषा नेमकं काय म्हणाल्या?
पीटी उषा म्हणाल्या होत्या की, खेडाळूंनी अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करणं योग्य नाही. त्यांनी किमान समितीच्या अहवालाची वाट बघायला हवी होती. त्यांनी जे काही केलं आहे ते खेळासाठी आणि देशासाठी योग्यनाही. हा एक नकारात्मक दृष्टीकोन आहे. याआधीही पीटी उषा यांनी पैलावनांमध्ये शिस्तीचा अभाव असल्याची टीका केली होती.