ताज्या बातम्यामनोरंजन

‘पोन्नियिन सेल्वन 2’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी गाठला इतक्या कोटींचा टप्पा

मुंबई | Ponniyin Selvan 2 – काल (28 एप्रिल) दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्यानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. तसंच या चित्रपटाला प्रेक्षकांंनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, ‘पोन्नियिन सेल्वन 2’नं पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये देशभरात 32 कोटींची कमाई केली आहे. तसंच या चित्रपटाची सर्वाधिक कमाई ही तमिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कमाई ही पहिल्या भागाच्या तुलनेत दोन कोटींनी कमी आहे. ‘PS-2’ च्या पहिल्या भागानं भारतात पहिल्या दिवशी 34 कोटींची कमाई केली होती तर जगभरात 80 कोटी रूपयांची कमाई केलेली. त्यामुळे आता या चित्रपटाचा दुसरा भाग जगभरात किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय, जयम रवी, कार्ती, त्रिशा, शोभिता धुलिपाला ,ऐश्वर्या लक्ष्मी आणि इतर कलाकार आहेत. तर हा चित्रपट भारतात तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये