इरफान खान यांची फिल्मी लव्हस्टोरी! आधी प्रेम, मग लिव्ह-इन रिलेशनशिप अन् अचानक…

मुंबई | Irrfan Khan – बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांची एक्झिट ही चाहत्यांना मोठा धक्का देणारी होती. आजही इरफान खान यांना त्यांचे चाहते विसरू शकलेले नाहीयेत. तसंच आज (29 एप्रिल) इरफान यांची तिसरी पुण्यतिथी आहे. 29 एप्रिल 2020 रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. तर आज आपण इरफान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकदर (Sutapa Sikdar) यांची फिल्मी आणि हटके लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.
दिल्लीच्या मंडी हाऊसमधील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये इरफान खान आणि सुतापा सिकदर यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये मैत्री झाली. मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मिळालेल्या माहितीनुसार, इरफान आणि सुतापा एका अॅक्टिंग सेशनमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यावेळी एकत्र शिकत असताना त्या दोघांच्या लक्षात आलं की त्यांच्यात खूप गोष्टी सारख्याच आहेत. त्यामुळे दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बददली.
इरफान आणि सुतापा हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर ते बराच काळ लिव्ह इनमध्ये राहिले होते. तेव्हा दोघंही आपापल्या करिअर लक्ष केंद्रित करत होते. पण काही काळानंतर सुतापा प्रेग्नंट राहिल्या. लग्नाच्या अगोदर सुतापा प्रेग्नंट राहिल्यानं त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागत होती. शेवटी त्या दोघांनी कंटाळून 23 फेब्रुवारी 1995 रोजी कोर्ट मॅरेज केलं.
एका मुलाखतीत इरफान खान यांनी सांगितलं होतं की, सुतापासोबत लग्न करण्यासाठी मी धर्म परिवर्तनही करायला तयार झालो होते. पण या गोष्टीची गरज पडली नाही. कारण सुतापाच्या कुटुंबियांनी मला माझ्या धर्मासह स्विकारलं होतं.