प्रियांका चोप्रानं ‘मेट गाला’मध्ये घातलेल्या नेकलेसची सगळीकडेच चर्चा, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

मुंबई | Priyanka Chopra – बाॅलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही वेबसीरिज ‘अॅमेझाॅन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाली आहे. तिच्या या सीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. या सीरिजसोबतच प्रियांका आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या प्रियांकाचा ‘मेट गाला’ इव्हेंटमधील लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या इव्हेंटमध्ये प्रियांकानं घातलेल्या नेकलेसनं सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
‘मेट गाला इव्हेंट 2023’मध्ये प्रियांकानं तिचा पती निक जोनससोबत हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक जोनसनं सेम रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी प्रियांका काळ्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या गाऊनवर प्रियांकानं 11.6 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाच्या नेकलेसची किंमच ही 25 मिलियन डाॅलर म्हणजेच तब्बल 204 कोटी रूपये आहे. तसंच ‘मेट गाला’नंतर प्रियांकाच्या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.
दरम्यान, प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली असून आता तिचा ‘लव्ह अगेन’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचा हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘लव्ह अगेन’ या चित्रपटात प्रियांकासोबत सॅम ह्युघन आणि सेलीन डिऑन दिसणार आहेत.