ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

मुंबई : (Chhagan Bhujbal On Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत, तसेच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काहींना वाटतंय त्यांनी दबावातून हा निर्णय घेतला आहे तर काहीजण या निर्णयाला मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे हे पद दिलं जाऊ शकतं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काहींच्या मते सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील आणि अजित पवारांकडे राज्यातला पक्षाचा कारभार सोपवला जाऊ शकतो. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता, भुजबळ म्हणाले, साधारणपणे पक्षाचा राज्यातल्या कारभार अजितदादा बघतात आणि दिल्लीतलं पक्षाचं काम संसदेचं काम सुप्रियाताई योग्य पद्धतीने सांभाळतात. सुप्रिया ताईंना प्रश्नांची जाण आहे. त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

भुजबळ म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. आम्ही सर्वजण शरद पवारांवर प्रेम करणारे लोक आहोत. ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जाण असल्याने आम्ही शरद पवारांचा हात धरला. शिवसेनेतून आलो आणि त्यानंतर राजकारणात त्यांचा हात धरून पुढची वाटचाल सुरू केली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळालं. देशातील प्रश्नांची जाण असणारे ते कदाचित एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक असा निर्णय घेणं धक्कादायक होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये