इतरक्रीडाताज्या बातम्या

धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार? चेन्नई सुपर किंग्जचे CEO म्हणाले, “पुढील सीझनमध्ये…”

मुंबई | MS Dhoni Retirement – गेल्या काही दिवसांपासून एम.एस.धोनी (MS Dhoni) आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. रविवारी (14 मे) चेपाॅक येथे धोनीनं लॅप ऑफ ऑनरमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर धोनी या सीझननंतर आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, आता यांसंदर्भात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशी विश्वनाथ यांनी म्हटलं आहे की, आम्हाला विश्वास आहे एम.एस.धोनी पुढील सीझनमध्येही खेळणार आहे. त्यामुळे मला आशा आहे की दरवेळेप्रमाणेच चाहते आम्हाला सपोर्ट करतील.

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ चमकदार खेळी करताना दिसत आहे. या संघानं आत्तापर्यंत 13 पैकी सात सामने जिंकले आहेत. तसंच सध्या सीएसके संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये