अन् शाहिद कपूर कार्तिकीकडे पाहतचं राहिला; सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया..

मुंबई– (Kartiki Gaikwad On Shahid Kapoor) कार्तिकी गायकवाड ही सारेगमप लिटील चॅम्पस् या शोमधून घराघरात पोहचली. कार्तिकीने खूप लहान वयात यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. आज तिच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. तिचे घाघर घेऊन हे गाणे जबरदस्त गाजलं. या शिवाय सध्या अनेक टीव्ही मालिकांच्या शिर्षकगीताला तिचा आवाज ऐकायला मिळतो. कार्तिकी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिथे ती आपल्या कुटुंबासोबत तसेच आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते.
नुकताच कार्तिकीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही तिच्यासोबत दिसत आहे. पण या फोटोला युजर्स मात्र मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. गायिका कार्तिकी गायकवाडने नुकतीच आपल्या वडीलांसोबत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज व्यक्ती आले होते. कार्यक्रमात कार्तिकी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासोबत फोटो घेत होती. पण अचानक त्या फोटोत शाहिद कपूरसुद्धा आला. त्याच्या फोटोमधील पोजमुळे सध्या हा सोशल मीडियावर तो फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
या फोटोवर आता सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नेटकरी कार्तिकी गायकवाड आणि शाहिद कपूरची मजा घेत आहेत. कमेंटमध्ये तिला अगं कार्तिकी तुझं लक्ष कुठेय, शाहिद तुझ्याकडे बघतोय, असे म्हटले आहे, तर एकाने शाहिदचं तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है हे गाणं पोस्ट केलं आहे. तर काहीजण फोटोचं कौतुक करत आहेत.