कॅमरुन ग्रीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, खंरतर रोहितचा एक मोठा निर्णय चुकला..

मुंबई : (IPL 2023 MI Vs LSG) मुंबई इंडियन्सचे फॅन्स सध्या खूप निराश आहेत. IPL 2023 च्या 63 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अवघ्या 5 धावांनी पराभव झाला. मुंबई संघ हा सामना आरामात जिंकणार होती. पण लखनऊ सुपर जायंट्सच्या मोहसीन खानने शेवटच्या षटकात बाजी पलटली. त्याने लास्ट ओव्हरमध्ये 11 धावांचा यशस्वी बचाव केला. टिम डेविड-कॅमरुन ग्रीन सारखे स्फोटक फलंदाज क्रीजवर असूनही मुंबईला धावा करता आल्या नाहीत.
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर या दोन खेळाडूंवर सातत्याने प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. खरंतर टिम डेविडने हाणामारीच्या ओव्हर्समध्ये मोठे फटके मारले. पण काही चेंडू त्याने निर्धाव सुद्धा खेळले. या चेंडूवर रन्स निघाले असते, तर निकालच चित्र बदललं असतं.
मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहित शर्माचा एक निर्णय सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही म्हणाला ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने 25 चेंडूत 37 धावा केल्या, मग तो मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कसा जबाबदार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने कॅप्टन म्हणून एक चूक केली. ज्याची किंमत टीमला चुकवावी लागली.
कॅमरुन ग्रीनला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 7 व्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवलं. या खेळाडूने 6 चेंडूत 4 धावा केल्या. 17.50 कोटी रुपये किंमत असलेल्या खेळाडूकडून यापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की कॅमरुन ग्रीन काही चांगला फिनिशर नाहीय. टॉप ऑर्डरमधला बॅट्समन आहे. क्रीजवर मोठे शॉट्स मारण्याआधी थोडा वेळ घेतो. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ग्रीनला विष्णू विनोदच्या नंतर बॅटिंगसाठी पाठवलं.