समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई | Sameer Wankhede – आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) एनसीबी मुंबईचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात शाहरूख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल करत कारवाईला सुरूवात केली आहे. यादरम्यान समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला आहे.
समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटक करू नये असे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. तसंच सीबीआयनं वानखेडेंच्या याचिकेवर सोमवारपर्यंत उत्तर द्यावं असे आदेशही देण्यात आले आहेत.
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयानं शनिवारी सीबीआय कार्यालयात जाऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच सीबीआयला वानखेडेंच्या याचिकेवर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.